आता प्रत्येक हातात दिसेल मेड इन इंडिया आयफोन! रतन टाटा यांच्या खास प्लॅनला सरकारचा हिरवा झेंडा

 देशात आयफोनच्या मॅन्यूफॅक्चरिंगला मोठा बुस्ट मिलाला आहे. 



भारतीय स्पर्धा आयोगाने टाटा-विस्ट्रॉन डीलला हिरवा झेंडा दाखवला आहे. 


बेंगलोरजवळ विस्ट्रॉनचा एक प्लांट आहे. 

येथे आईफोनचे असेम्बलिंग होते. टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन यांच्यात या डीलसाठी जवळपास एक वर्षापासून चर्चा सुरू होती.

 विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन-14 मॉडेलच्या प्रोडक्शनसाठी ओळखला जातो. या प्लांटमद्ये सद्या जवळपास 10,000 हून अधिक वर्कर्स काम करतात. 

विस्ट्रॉनचा भारतातील प्लांट आपल्या 8 उत्पादनांपैकी आयफोनचेही मॅन्यूफॅक्चरिंग करते.


विस्ट्रॉनला भारतातील आयफोन बिझनेसमधून बाहेर पडायचे आहे आणि टाटाने विकत घेण्यास उत्सुकता दर्शवली आहे.

 टाटाच्या अधिग्रहणानंतर, विस्ट्रॉन भारतीय बाजारातून पूर्णपणे बाहेर पडेल. कारण हा भारतातील अॅपल प्रोडक्ट्सचे प्रोडक्शन करणारा कंपनीचा एकमेव प्लांट आहे. ही कंपनी 2008 मध्ये भारतात आली होती. तेव्हा ही कंपनी अनेक डिव्हाइसेससाठी रिपेयर फॅसिलिटी प्रोव्हाइड करत होती. 2017 मध्ये कंपनीने अपले ऑपरेशन्स एक्सपांड केले आणि अॅपलसाठी आयफोनचे प्रॉडक्शन सुरू केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या