महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केल्यास सरकारकडून भेटेल हा फायदा

 महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केल्यास सरकारकडून  भेटेलहा फायदा

 

महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केल्यास सरकारकडून हा फायदा भेटेल

 महिलांच्या नावाने प्रॉपर्टी केल्यास सरकारकडून  भेटेलहा फायदा


आज आपण बघणार आहोत की प्रत्येक जण आपल्या भविष्यासाठी काही ना काही मालमत्ता घेत असतो त्यातच ती कोणाच्या नावावर करायची आहे याच्यावर आपण माहिती घेणार आहोत जर आपण घरातील महिलांच्या नावावर ही मालमत्ता केलीस सरकारकडून आपल्याला काय फायदा भेटतो याची माहिती आपण या लेखनात पूर्ण घेणार आहोत

सध्या जर आपण एकंदरीत भारताची स्थिती पाहिली तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून रियल इस्टेट मधील गुंतवणुकीला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात येत आहे.
मोठ्या मोठ्या शहरांमध्ये घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना आपल्याला दिसून येते.

एवढेच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील शेती किंवा घर, प्लॉटसारख्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला बरेच जण दिसून येतात.

परंतु जेव्हा आपण रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा खरेदी विक्रीच्या वेळेस अनेक प्रकारचे शुल्क आपल्याला भरणे गरजेचे असते.

यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त खर्च हा स्टॅम्प ड्युटीवर येत असतो.

बरेचदा आपण घर घेताना कर्ज घेतो या कर्जावर आपल्याला व्याज द्यावे लागते. परंतु जर तुम्ही अशी रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिलांच्या नावे केली तर तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.

 

त्यामुळे आता बरेच लोक हे मालमत्ता खरेदी करताना ती महिलांच्या नावे खरेदी करताना आपल्याला दिसून येतात. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये महिलांनी रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली तर कोणते फायदे मिळू शकतात याविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.

 

1- कर्जवव्याजदरामध्येमिळतेसवलतबरेच व्यक्ती हे घर खरेदी करताना कर्ज घेतात. कारण एकाच वेळी एवढे रक्कम गुंतवणे प्रत्येकाला शक्य नसते त्यामुळे गृहकर्ज हा पर्याय उत्तम ठरतो. जर गृह कर्ज घेताना ते महिलांच्या नावाने घेतले तर अनेक प्रकारचे आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे फायदे मिळू शकतात.

 

यामध्ये बऱ्याच बँका वित्तीय संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष योजना ऑफर्सची देखील घोषणा केली जाते. आपण पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी चा विचार केला तर महिलांना गृहकर्जावरील व्याजदर हा 0.20 ते 0.50% पर्यंत कमी असतो. तसेच कर्ज परतफेडीचा जो काही कालावधी असतो तो पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी जास्त असतो.

 

2- स्टॅम्पड्युटीतहोतोफायदाआपल्याला माहित आहे की मालमत्तेची खरेदी विक्री जेव्हा होते तेव्हा मुद्रांक शुल्क आकारले जाते. साधारणपणे सहा ते आठ टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क हे आकारले जात असते. मुद्रांक शुल्क ही संबंधित प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेची किंमत किती आहे त्यानुसार ठरते.

 

परंतु जर तुम्ही महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी केली तर मुद्रांक शुल्कामध्ये चांगली सवलत मिळते. महिलांना जवळपास मुद्रांक शुल्क मध्ये एक टक्क्यांपर्यंत सवलत सरकारकडून दिली जाते. त्यामुळे मुद्रांक शुल्क यावर जी काही सगळ्यात जास्त रक्कम खर्च होत असते ती तुम्ही वाचवू शकता.

 

3- सरकारीयोजनांचामिळतोफायदाप्रॉपर्टीमध्ये महिलांनी गुंतवणूक करावी याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्यामुळे महिलांच्या नावावर जर प्रॉपर्टी खरेदी केली तर अशावेळी त्यांचा फायदा घेता येतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर पंतप्रधान आवास योजना तसेच क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम यासारख्या अनेक योजनांचे फायदे मिळू शकतात. नाहीतर अनेक हाऊसिंग फायनान्स कंपनी बँकांच्या योजनांचा देखील फायदा मिळतो.

 

4- करातमिळतेसवलतजर पती पत्नी दोघांनी संयुक्तपणे प्रॉपर्टी खरेदी केली तर त्यांना घरात सवलत मिळण्यास मदत होते. कलम 80 C,24 आणि कलम 80 EE आणि 80 EEA अंतर्गत गृह कर्जाच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा देखील फायदा मिळतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या