तुमचं आधार कार्ड कोणी वापरत तर नाही ना? गैरवापर टाळण्यासाठी करा हे काम!

 तुमचं आधार कार्ड कोणी वापरत तर नाही ना?  गैरवापर टाळण्यासाठी करा हे काम!


तुमचं आधार कार्ड कोणी वापरत तर नाही ना?  गैरवापर टाळण्यासाठी करा हे काम!


आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचा कागदपत्रापैकी एक आहे. त्यात तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे जर ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर त्याचा गैरवापर तुमचं मोठं नुकसान करू शकतो.


अनेकवेळा तुमच्या आधार कार्डचा तुमच्या पाठीमागे गैरवापर होत असतो आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसते.

 जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर तुम्ही एक छोटीशी गोष्ट करून त्यापासून संरक्षण करू शकता. तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या ईमेल आयडीसोबत लिंक करू शकता .

तुमचं आधार तुमच्या ईमेल आयडीशी लिंक केल्यानं तुम्हाला असा फायदा मिळेल की जेव्हा कोणी तुमचा आधार वापरेल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. 

हे तुम्हाला नकळत कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होण्यापासून वाचवेल तसेच बँकेच्या गैरवापरापासून वाचता येईल.


कसे कराल आधार ई-मेलशी लिंक?

UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमचा आधार तुमच्या ईमेल आयडीशी लिंक करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावं लागेल. 

आजकाल तुम्हाला प्रत्येक शहरात आधार केंद्रे दिसतील. या केंद्रांवर आधारशी संबंधित सर्व प्रकारची कामं केली जातात. या केंद्रांना भेट देऊन तुम्ही आधारशी ईमेलशी लिंक करण्याचे काम पूर्ण करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या