मराठा समाज्याच्या सगळ्या मागण्या मान्य...सगेसोयरेंच्या अध्यादेशात आहे तरी काय?

 मराठा समाज्याच्या सगळ्या मागण्या मान्य...सगेसोयरेंच्या अध्यादेशात आहे तरी काय? मराठा समाज्याच्या सगळ्या मागण्या मान्य...सगेसोयरेंच्या अध्यादेशात आहे तरी काय? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. 

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर आंदोलनावर तोडगा निघाला.

 सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जारी केलेल्या अध्यादेशात आता सगेसोयरेंबाबतचा मुद्दादेखील समाविष्ट केला आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

सरकारचा याबाबत नेमका अध्यादेश काय आहे, सरकारच्या अध्यादेशात सगेसोयरेबाबत नेमकं काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया


सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलं आहे?

सगेसोयरे – सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल.

 यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.


अध्यादेश पाहण्यासाठी खाली पहा.......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या