शिक्षण क्षेत्रात मोठा बदल | आता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक

 मोठी बातमी 

पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक
पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक

शिक्षण क्षेत्रात मोठा बदल | आता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा पास होणे बंधनकारक

आता आठवीपर्यंत ढकलाढकली बंद, 5 वि आणि 8 वि मध्ये नापास झाल्यास...


शिंदे सरकारने शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला आहे

आणि 5 वि आणि 8 वि च्या विध्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे 


महाराष्ट शिक्षण पोलिसी Maharashtra Education Policy- शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आठवीपर्यंत सरसकट पास चा निर्णय मागे घेत आता 5वी आणि 8 वी ला वार्षिक परीक्षा असणार आहे 

नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे आणि पाचवी आणि आठवी मध्ये नापास झालेल्या विध्यार्थ्यांना परत परीक्षा देता येणार आहेत.

मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क कायद्यानुसार (Right to Education Act)  धोरणानुसार विध्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे आठवीपर्यंत सरसकट पास करण्याच्या निर्णयात बदल करण्यात आले आहेत.


नापास विध्यार्थ्यांना पुन्हा संधी


महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे 

शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करून पाचवी आणि आठवी ला आता वार्षिक परीक्षा ठेवली आहे 

पाचवी आणि आठवी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पर्याय ठेवला आहे. जर कोणी पाचवी आणि आठवी मध्ये नापास झाले तर त्याला लगेच परत परीक्षा देता येणार आहे.

परत दिलेल्या परीक्षेत पण विध्यार्थी नापास झाला तर त्याला त्याच वर्गात राहावे लागणार आहे 


तर अशा प्रकारे शिक्षण विभागाने नवीन शिक्षण धोरणामध्ये हे बदल केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या